नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) मैदानावर जितका कूल दिसतो तितकाच तो बाहेरही आहे. त्याची बाइक्सची आवड कोणापासूनही लपलेली नाही. त्याचबरोबर धोनीला प्राणी देखील खूप आवडतात. याचा पुरावा म्हणजे त्याचे रांची येथील फार्महाऊस. जिथे त्याने अनेक परदेशी जातीच्या श्वानांसह घोडेही पाळले आहेत. धोनीला जेव्हा-जेव्हा संधी मिळते तेव्हा तो त्यांच्यासोबत वेळ घालवायला विसरत नाही. आता धोनीला एक खास मित्रही मिळाला आहे. जो त्याच्या फार्महाऊसमध्ये राहतो.
महेंद्रसिंग धोनीचा हा खास मित्र दुसरा कोणी नसून त्याचा पोनी आहे. जो त्याने गेल्या वर्षी खरेदी केला होता. या पोनीची धोनीशी असलेली मैत्री खास आहे. साक्षीशिवाय धोनीची आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जनेही पोनीसोबतचा त्याचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये धोनी त्याच्या खास मित्राला काहीतरी खाऊ घालताना दिसत आहे. धोनीची पत्नी साक्षीने खास मित्र पोनीसोबतचा धोनीचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये धोनी सोफ्यावर झोपलेला दिसत आहे. यादरम्यान तो पोनीला हाताने काहीतरी खाऊ घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना साक्षीने लिहिले ,”मा झ्यासाठी हे खूप सोपे होते.” व्हिडिओ शेअर होताच कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला. टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलनेही या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला’
- युगायुगांच्या बेड्या तोडणाऱ्या सावित्रीबाई रणरागिणी होत्या- अमोल कोल्हे
- ‘सावित्रीबाईंनी जे कार्य केले,त्याचे मोजमाप कोणत्याच परिमाणात करता येणं अशक्य’
- ‘सुप्रिया सुळे थापा मारताय की हे सगळेच लोकप्रतिनिधी…’, भातखळकरांचा हल्लाबोल
- ‘अंधेर नगरी घरी बसला राजा’, म्हाडा आणि एमपीएससीच्या परीक्षेवरून भातखळकरांचे टीकास्त्र
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<