तुकोबांची पालखी आज आकुर्डी मुक्कामी

टीम महाराष्ट्र देशा : जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या ३३३ व्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली असून विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्ञानोबा-तुकारामचा जयघोष करीत लाखो वारकरी देहू नगरीत दाखल झाले आहेत. टाळ-मृदुंगाच्या गजराने अवघी देहू नगरी दुमदुमली आहे. पालखी सोहळाप्रमुख व विश्वस्त यांच्या हस्ते पहाटे साडेचारच्या सुमारास श्रींची महापूजा आणि शिळामंदिरातील महापूजा झाली. त्यानंतर पालखी सोहळ्याचे जनक तापोनिधी नारायणमहाराज समाधीची महापुजा करण्यात आली आहे.

Rohan Deshmukh

दुपारी दोनच्या सुमारास पालखी सोहळ्याला सुरुवात झाली, पालकमंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधीच्या हस्ते या पालखीची महापूजा झाली. दुपारी चारच्या सुमारास मंदिरातून पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. दरवर्षीप्रमाणे पहिला मुक्काम हा इनामदार वाड्यात असणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी देहू नगरीत दाखल झाले आहेत. दरम्यान, आंबी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या १०० जणांच्या पथकाने देहू नगरीत स्वच्छतेचे संदेश देत वारकऱ्यांनी जेवणासाठी वापरलेल्या पत्रावळ्या आणि कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावताना दिसत आहेत. यात मोठ्या प्रमाणावर विद्यर्थिनींचा सहभाग आहे.

विठूरायला भेटण्यासाठी वारकर्यांमध्ये उत्सवाचं वातावरण आहे. अवघी देहू आळंदी ज्ञानोबा-तुकारामाच्या नामघोषात दंग झाली आहे. संत ज्ञानोबा महाराजांच्या पालखीचे आज संध्याकाळी ४ वाजता प्रस्थान होणार आहे. ही पालखी आज गांधीवाडा येथे मुक्कामी राहणार आहे. तर संत तुकोबांची पालखी आज इनामदार वाड्यात पंढरीच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. ही पालखी आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरात मुक्कामी राहणार आहे.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...