मुलांमध्ये शेतीची आवड निर्माण करण्यासाठी विलासरावांचा लेक थेट शेतात…

dhiraj deshmukh

लातूर : राज्यात जूनच्या सुरुवातील समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी सुरू केली आहे. यंदाच्या वर्षी वेळेवर पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीलाही सुरवात केली आहे. कोरोना आणि लॉकडाउनचा काळ असतानाही शेतकऱ्यांनी बि बियाणे आणि खते खरेदी करुन पेरणी केली. अशात राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख हे देखील शेतात पेरणी करत आहेत. मात्र आपल्या मुलांना देखील . शेती विषयीची आवड आपल्या मुलांमध्ये रुजावी यासाठी त्यांना घेऊन ते पेरणी करत आहेत.

सध्या पाऊस अपेक्षेप्रमाणे पडत असल्याने सर्वत्र पेरणीस गती आली आहे. बाभळगाव येथील आमच्या शेतात पाळी घालून सोयाबीनची पेरणी केली. पावसाची वाटचाल समाधानकारक असून खरीप हंगामाकडून खूप मोठ्या आशा आहेत. ऊस, सोयाबीन व अन्य पीक हे उत्तमरीत्या येऊन त्या माध्यमातून अपेक्षीत उत्पन्नाची सर्वानाच आशा आहे. अस धीरज देशमुख म्हणाले आहते.

जलद चाचण्यांसाठी रॅपिड टेस्ट किट खरेदी करा – बच्चू कडू

दरम्यान, आमच्या कुटुंबाची शेतीशी असलेली नाळ हि कायम असून येणाऱ्या पिढीस शेतीची संस्कृती हि समजून यावी यासाठी आवर्जून सहकुटुंब मी शेतात आलो होतो. आदरणीय आईनी स्वतः शेतीत लक्ष देऊन विविध प्रयोग केले आहे. शेडनेट मधील भाजी असेल अथवा सेंद्रिय उसाची लागवड या बाबतीत आई नेहमी प्रयत्नशील असतात. शेती विषयीची आवड माझ्या मनात निर्माण करण्यात आईंचा मोठा वाटा आहे. शेती विषयीची हीच आवड माझ्या मुलांमध्ये रुजावी हा माझा प्रयत्न आहे. अस देखील धीरज देशमुख म्हणाले आहेत.

मोठी बातमी : संजय कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव, अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे सल्लागार