fbpx

भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 353 धावांचे तगडे आव्हान

टीम महाराष्ट्र देशा : भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ यंदाच्या विश्वचषकाचे प्रबळ दावेदार आहेत. हे दोन्ही तगडे संघ आज एकमेकांविरोधात ओव्हलच्या मैदानावर भिडणार आहेत. दरम्यान भारतानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतानं ऑस्ट्रेलियासमोर 353 धावांचे आव्हान ठेवले आहे.

प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि धवन यांची पहिली भारतीय सलामीची जोडी ठरली आहे, ज्यांनी वर्ल्ड कपमध्ये शतकी भागीदारी केली आहे. आतापर्यंत केवळ तीन सलामीच्या फलंदाजांनी अशी कामगिरी केली होती. स्मिथ आणि डिव्हिलियर्स यांनी 2007 तर, गूच आणि बॉथम यांनी 1992मध्ये शतकी भागीदारी केली होती. रोहित आणि धवन यांनी 127 धावांची भागीदारी आजच्या सामन्यात केली. तर, शिखर धवननं 95 चेंडूत आपलं शतक पुर्ण केले. यात 13 चौकारांचा समावेश आहे. शतकी खेळी केल्यानंतर 117 धावा करत धवन बाद झाला.

त्यानंतर फलंदाजीची धुरा सांभाळली ती विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी. विराटनं आपल्या अर्धशतकांचे अर्धशतक पुर्ण केले. त्यानंतर हार्दिक पांड्यानं आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. या दोघांनी केवळ 37 चेंडूत 50 धावांची भागीदारी पुर्ण केली. विराट कोहली 82 धावांवर बाद झाला. कोहलीला आपले शतक पुर्ण करता आले नाही. मात्र त्याच्या या खेळीमुळं भारतानं 350चा टप्प गाठला आहे. आता कांगारूंना या धावसंखेच्या आत रोखण्याचे काम भारतीय संघाला करावे लागणार आहे.