fbpx

माढ्यातून धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाची चर्चा.

dhawalsinh mohite patil

जेऊर- आगामी लोकसभा निवडणूकीत माढा मतदार संघातून धवलसिंह मोहिते-पाटील यांचे नाव जवळजवळ निश्चित झाले असून मोर्चेबांधणीला वेग आला आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आगामी लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या असून शिवसेनेकडून माजी खासदार कै प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

धवलसिंह मोहिते-पाटील हे सध्या सोलापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत.
मागील २०१४ लोकसभेला राष्ट्रवादी कडून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील तर भाजप-शिवसेना-स्वाभिमानी महायुती कडून सध्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत निवडणूकीच्या रिंगणात होते त्यावेळी मोदी लाट असूनही विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सदाभाऊ खोत यांचा पराभव केला होता. त्यावेळी सदाभाऊ खोत हे महायुती कडून असल्यामुळे या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार दिलेला नव्हता परंतु सध्याची परिस्थिती पहाता उध्दव ठाकरे यांनी शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे घोषित केल्याने माढा मतदारसंघातून शिवसेनेकडून नव्या उमेदवाराचा शोध सुरू झालेला आहे.

माढा मतदार संघात सोलापूर जिल्ह्यातील माढा, सांगोला, माळशीरस,करमाळा, तर सातारा जिल्ह्यातील फलटन आणि माण तालुक्याचा समावेश आहे.धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या पेक्षा दुसरा तगडा उमेदवार शिवसेनेकडे नसल्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.धवलसिंह मोहिते-पाटील यांचे माळशीरस मध्ये चांगले वर्चस्व आहे तसेच करमाळ्याचा आमदार शिवसेनेचा असल्यामुळे तसेच माढा, सांगोला,फलटन तालुक्यांमध्ये धवलसिंह मोहिते-पाटील यांचे चांगले संपर्क असल्यामुळे असल्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.