धवलसिंह मोहिते-पाटील आणि रणजितसिंह मोहिते-पाटील आता करणार एकत्र काम !

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेच्या निमित्ताने माढा लोकसभा मतदार संघात सध्या अशक्य अश्याच राजकीय घडामोडी सातत्याने घडताना दिसत आहे. आज अकलूजच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना मुंबई येथे घडल्याची समजते आहे.

शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आज धवलसिंह यांनी मुंबई येथे भाजप नेत्यांना भेटले आहेत.
या भेटीमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील आणि धवलसिंह मोहिते पाटील एकत्र काम करणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दोन भावांमध्ये असलेला विरोध यानिमित्ताने संपणार आहे.

धवलसिंह मोहिते पाटील हे काही दिवसांमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही ठरले आहे. योग्य वेळ साधून प्रवेशाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. धवलसिंह यांच्या पालकत्वाची जबाबदारी विजयकुमार देशमुख यांनी घेतली आहे. त्यांच्या सोबत बार्शीचे माजी आमदार राजाभाऊ हेही उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून दोन भावामध्ये असेले हाडवैर पुसत सोलापूरच्या राजकारणात नवीन समीकरणे मांडण्याचे ठरले आहे. हि सगळी समीकरणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित ठरली असल्याचे समजते आहे.