fbpx

रणजितसिंह भाजपवासी होताच,धवलसिंह मोहिते-पाटील पवारांच्या भेटीला

dhawalsinh mohite patil

टीम महाराष्ट्र देशा : माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज अखेर भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपचा झेंडा त्यांच्या हाती देत भाजप प्रवेश दिला आहे. दरम्यान,या प्रवेशानंतर भाऊबंदकी पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपला आणखीन बळ मिळाले आहे. तर राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात असताना रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले चुलत बंधू आणि शिवसेनेचे सहसंपर्क नेते डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी मुंबई येथे शरद पवारांची भेट घेतली आहे. मुंबईत झालेल्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे जरी गुलदस्त्यात असलं तरीही ज्या पार्श्वभूमीवर धवलसिंह यांनी भेट घेतली आहे त्यावरून काय चर्चा झाली असेल हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.

कोण आहेत धवलसिंह मोहिते पाटील ?
धवलसिंह हे माजी सहकार राज्यमंत्री स्व.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र आहेत. अकलुज परिसरात मोठी ताकद असलेला युवक नेता म्हणून त्यांची ओळख आहे. सोलापूर जिल्हा परिषदमध्ये त्यांनी सदस्य म्हणून काम केलेले असून अनेक संस्थांवर ते अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत.