औरंगाबाद : गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहरात अनधिकृत पार्किंगच्या समस्येने डोके वर काढले आहे. जागोजागी वाहने पार्किंग केली जातात. यामुळे सर्वच ठिकाणी अगदी गल्लीबोळातही पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. मनपा आणि पोलिसांचे दुर्लक्ष आणि एकूणच प्रशासनाची ढिलाई यामुळे शहरात रस्ते वाहनांनी व्यापले आहेत.
गेल्या दोन-तीन दिवसापासून महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे अनधिकृत पार्किंग असलेल्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उचलणे सुरु आहे. मंगळवारी शहरातील विविध इमारतीमधील पार्किंग परिसरातील अनधिकृत बांधकामाविरोधात मनपा तसेच अतिक्रमण हटाव विभागामार्फत कार्यवाही करण्यात आली.
महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभाग, नगररचना विभागलयांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारी पार्किंग अतिक्रमण मोहिमेअंतर्गत जालना रोड येथील सतबीरसिंग छटवाल यांनी पार्किगमधे अनाधिकृतपणे बांधकाम करुन ४ दुकाने काढली होती ती आज तोडण्यात आली. तसेच चेतन ट्रेड सेंटर या वाणिज्य कॉम्लेक्समध्ये मालकाने रस्त्यामध्ये व सामासिक अंतरामधे बांधलेले ३ जीने स्वतःहुन काढुन घेतले. सदर मोहीम अशीच सुरु राहणार आहे. पार्किमधील जास्तीचे बांधकाम व इतर अतिक्रमण नागरीकांनी स्वतःहुन काढुन घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र !
- “हो, मी ‘त्या’ महिलेसोबत संबधात होतो, पण तक्रार खोटी”, धनजंय मुंडेचे स्पष्टीकरण
- कृषी कायद्यांचा वाद सोडविण्यासाठी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील ‘या’ झुंजार नेत्यावर सोपवली जबाबदारी
- राज ठाकरेंच्या हाताला दुखापत; फ्रॅक्चर लावून पक्षाच्या बैठकांमध्ये झाले सामील
- मका, ज्वारी आणि बाजरी खरेदीचा लक्षांक वाढल्याने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा – भुजबळ