योगगुरू रामदेव बाबा आता या कारणाने चर्चेत; कारण वाचून तुम्हीही हसाल

baba ramdev

योगगुरू रामदेव बाबा नेहमी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतात . मात्र यावेळी रामदेव बाबा नव्हे तर बाबांची दाढी चर्चेत आहे. बाबांची दाढी एका कार्यक्रमात खेचण्यात आल्याने बाबांची दाढी चर्चेत आली आहे. मुंबईत ‘वर्ल्ड पीस अँड हार्मोनी’ या कार्यक्रमात जगभरातील दिग्गज व्यक्तींनी शांततेचा संदेश दिला. धर्मगुरू दलाई लामा यांनी आज या कार्यक्रमात योगगुरू रामदेव बाबा यांची दाढी खेचली तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी उपस्थितांना हसू अनावर झाले.

या कार्यक्रमात जेव्हा दलाई लामा बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी योगगुरू रामदेवबाबांना आपल्या जवळ बोलावून घेतले. एवढेच नाहीतर त्यांची दाढी पकडून खेचली आणि त्यांच्यासोबत काहीशी मस्करीही केली. ‘विश्व शांती’ या उद्देशाने सुरू झालेल्या या कार्यक्रमात ही दृश्यं पाहून लोक हसले.

या कार्यक्रमात योगगुरू रामदेवबाबा आणि दलाई लामा यांच्यासह इतर अनेक दिग्गजही सहभागी झाले होते. सगळ्यांनी जागतिक आणि देशातील शांततेबाबत आपली मतं मांडली.