fbpx

मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील याच्या मुलाचाही आत्महत्येचा इशारा

टीम महाराष्ट्र देशा : वीज प्रकल्पासाठी गेलेल्या शेत जमिनीला योग्य मोबदला मिळाला नाही म्हणून धर्मा पाटील यांनी मागील वर्षी मंत्रालयात 22 जानेवारी 2018 या दिवशी विष प्राशन केलं होत त्यानंतर 28 जानेवारी 2018 रोजी धर्मा पाटील यांच्यावर उपचार सुरू असताना निधन झाले होते. परंतु वर्ष उलटून गेल्यानंतरही कुटुंबियांना योग्य न्याय न मिळाल्याने आणि दोषींवर अद्यापपर्यंत कारवाई न झाल्याने धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र धर्मा पाटील यांनी आत्महत्येचा इशारा दिला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवले आहे.

धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस एक वर्षाचा कालावधी होत आला आहे. परंतु दोषींवर अजूनही कारवाई झाली नाही. त्याच बरोबर दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देणारे आणि या प्रकरणात मध्यस्थी करणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अपयशी ठरले आहेत. याची नैतिक जबाबदारी घेऊन या मंत्र्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नरेंद्र धर्मा पाटील यांनी केली आहे.