सुजय विखेंच्या पत्नीचा नगर दक्षिण मधून अर्ज दाखल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

टीम महाराष्ट्र देशा : भाजपकडून डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी चार अर्ज दाखल केल्यानंतर आज त्यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी अवघे शेवटचे ५ मिनिट शिल्लक असताना अर्ज दाखल केला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून धनश्री विखे यांनी अर्ज दाखल केला आहे. यामुळे राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या अर्जावर संजना चंद्रशेखर कोळसे अनुमोदक व सुचक या आहेत.

मात्र सध्या धनश्री विखे यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगली आहे. दरम्यान, सुजय यांच्या प्रत्येक निर्णयामागे मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे, अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील यांनी सुजय विखेंच्या प्रवेशावेळी दिली होती .

सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर त्या म्हणाल्या होत्या की, निर्णय प्रक्रियेतही मी त्यांच्यासोबत आणि सहमत होते. मला कधी त्यांना राजकीय सल्ला देण्याची गरज पडली नाही. पण प्रत्येक निर्णय आम्ही चर्चा करुन घेत असतो.माझ्यापेक्षा त्यांना आई-वडिलांचा सल्ला अधिक मोलाचा आहे.घरात फार राजकीय चर्चा करणं टाळतो. सुजय यांच्या प्रचारात मी काम करणार आहे असं देखील त्या म्हणाल्या होत्या.