कॅमेरामन ‘पद्मश्री’ धनराज पिल्ले

दीपक पाठक: सामान्य कुटुंबात जन्मलेला व आपल्या जिद्दीच्या व कौशल्याच्या जोरावर भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदापर्यंत मजल मारलेला जिगरबाज खेळाडू म्हणजे धनराज पिल्ले. अर्जुन,खेलरत्न के .के. बिर्ला ,पद्मश्री असे वेगवेगळे पुरस्कारप्राप्त हा खेळाडू चक्क एका कार्यक्रमात कॅमेरा करताना पहायला मिळाला
झालं असं की, एका पत्रकार परिषदेच्या निमित्ताने धनराज पुण्यात आला होता तेव्हा पत्रकार परिषद संपल्यानंतर बरेच जण धनराजसोबत फोटो काढत होते.त्या ठिकाणी कॅमेरामन प्रथमेश जावळे याला देखील धनराज सोबत फोटो काढण्याची इच्छा झाली मात्र हातात कॅमेरा असताना त्याला फोटो काढता येईना.धनराजने त्याची ही अडचण ओळखत त्याच्या हातातून कॅमेरा घेतला आणि फोटो काढू दिला यानंतर धनराज ने व्हिडिओ शुटिंगची थोडी माहिती घेतली आणि नंतर शूटिंग देखील केलं.धनराजच्या या दिलखुलास वागण्याने सर्वांचीच मने जिंकून घेतली.