‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का ?’

टीम महाराष्ट्र देशा : ‘सूरक्षा व्यवस्था कमी करून सरकारचा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ व जितेंद्र आव्हाड मारण्याचा कट आहे का ? असा गंभीर सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला आहे.सरकार विरोधी बोलतात,सरकारच्या चुकीच्या कारभारावर टीका करतात म्हणून जर राज्य सरकार सुरक्षा व्यवस्था कमी करत असेल तर ते अयोग्य आहे.त्याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच भेटणार आहे.नाशिक येथे ते बोलत होते.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे राज्याचे मोठे नेते आहेत.ते नेहमी जनतेच्या हिताची भूमिका मांडतात.जिथे सरकारचे चुकत असेल तिथे सरकारवर टीका करतात.सरकारने हा निर्णय कोणत्या हेतूने घेतला ते समजत नाही, मात्र हे अयोग्य आहे असे म्हणत धनंजय मुंडे खंत व्यक्त केली.पुढे बोलताना म्हणाले,जितेंद्र आव्हाड यांना धमक्या आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा कमी करुन सरकारने त्यांना मारण्याचा कट रचला आहे का?, असा सवाल उपस्थित केला.व याविरोधात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा