आंदोलनकर्त्यांवर कुठे गोळ्या घालायच्या याचा जीआरच सरकारने काढावा : धनंजय मुंडे

अहमदनगर: सरकारने आता आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणा-या शेतकरी, अंगणवाडी कर्मचारी, एस टी कर्मचारी, शिक्षक या आंदोलनकर्त्यांवर कुठे गोळ्या घालायच्या याचा जीआरच काढावा म्हणजे झाले. सरकारने आता फक्त तेव्हढेच शिल्लक ठेवले आहे. असा जोरदार घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

शेतक-यांवरील गोळीबाराचा निषेध करण्याऐवजी रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांवरचा गोळीबार एक प्रकारे योग्य ठरवला आहे, फक्त गोळ्या मारण्याची जागा चुकली असा त्यांचा दावा आहे. गोळीबाराचे समर्थन करणाऱ्याया अशा नेत्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा धिक्कार असो अस म्हणत धनंजय मुंडे यांनी शेवगावमधील शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारावर रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला आहे.

You might also like
Comments
Loading...