गोपीनाथ मुंडेंच्या सन्मानासाठी धनंजय मुंडेंचा रुद्रावतार

नागपूर: भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याणकारी महामंडळाची सरकारने घोषणा करून तीन वर्ष झाली तरी अद्याप कार्यालयही नाही आणि सरकार म्हणतय परळी मध्ये कार्यालय आहे मी परळीचा रहिवासी आहे मला पत्ता सांगा. अस म्हणत विधानपरिषद विरोधीपक्ष नेते यांना सभागृहात भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला. अद्याप या महामंडळातून एकाही कामगाराला मदत नाही, महामंडळ हि नाही आणि कार्यालयही नाही नाही हा स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांचा अपमान आहे. भाजप सरकारने हा अवमान केला असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

आज प्रश्नोत्तराच्या तासात या बाबतच्या प्रश्नावर मुंडे यांनी कामगार मंत्री संभाजी पाटील यांना धारेवर धरत स्व. मुंडे यांचा अवमान केल्याप्रकरणी माफी मागा अशी मागणी केली. तर ज्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला वाडी वस्तीत नेले, त्याच गोपीनाथरावांची उपेक्षा भाजपने चालवली आहे. असा आरोप देखील धनंजय मुंडेंनी केला आहे.

1 Comment

Click here to post a comment