fbpx

बापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते आपल्या विरोधात असलेल्या नेत्यावर टीका-टिपणी,आरोप-प्रत्यारोप करत असतात पण आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्वीटर वरून मुख्यमंत्र्यांनी मंत्री बापटांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी असा सल्ला दिला आहे.

दरम्यान अन्नपुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या औरंगाबाद खंडपीठाने मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवला आहे. स्वस्त धान्य दुकानाच्या संबंधित एका निकालाच्या प्रकरणात हायकोर्टाने गिरीश बापट यांना झापलं आहे. कर्तव्यात कसूर आणि मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका बापट यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

गिरीश बापटांवर उच्च न्यायालयाने वारंवार वेगवेगळ्या प्रकरणी ठपका ठेवला आहे त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा अधिकार राहिला नसून मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी असे धनंजय मुंडे म्हणाले.

नेमक काय आहे प्रकरण?
2016 च्या एका प्रकरणात तत्कालीन तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांनी काही स्वस्त धान्याची दुकानांची चौकशी करुन नियमाची पायमल्ली करत असल्याने बंद केली होती. मात्र हाच निर्णय गिरीश बापट यांनी रद्द करुन त्या दुकानदारांना पुन्हा एकदा संधी दिली होती. याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती आणि याचिकेवर निकाल देताना खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे.

चौकशीनंतर कारवाई केली तर ती योग्य आहे आणि तो निर्णय मंत्र्यांनी का रद्द करावा हे कळत नाही, असं मत न्यायालयाने नोंदवलं आहे. गिरीष बापटांनी कर्तव्यात कसूर आणि मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. तसंच बापटांनी घेतलेला निर्णय न्यायालयाने रद्द केला आहे.