बीडमध्ये धनदांडग्याची पोरगी विरुद्ध गरीब शेतकऱ्याचा मुलगा असा रंगणार सामना : धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक राजकीय पक्ष हा प्रचारात सक्रीय झाला असून विरोधक आणि सत्ताधारी यांमध्ये शाब्दिक युद्ध पाहिला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी सत्ताधारी भाजप नेत्यांवर टीका केल्या आहेत. खोटी आश्वासने देत सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जनतेची घोर फसवणूक केली असून देशात एक प्रकारची हुकुमशाही आणली आहे. असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे तर बीड जिल्ह्याची निवडणूक ही श्रीमंताची मुलगी विरुद्ध गरीब शेतकऱ्याचा मुलगा अशी होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. असा टोला मुंडे भगिनींना लगावला आहे.

मंगळवारी बीड जिल्हा मित्रमंडळातर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ बैठक पार पडली .त्यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, बीड लोकसभेमध्ये श्रीमंताची मुलगी विरुद्ध गरीब शेतकऱ्याचे पोरगे असा सामना रंगणार आहे. त्यामुळे त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. तर आता नरेंद्र मोदी यांनी मागच्या लोकसभे वेळी केलेली भाषणे काढून ऐकली तर आता त्यांना प्रचार सभांमध्ये कसे जावे असा प्रश्न पडेल. त्यामुळे आता मोदींची अवस्था गजनी चित्रपटातील नटासारखी झाली आहे.

मुंडे पुढे म्हणाले की , बीडमध्ये एकाच कुटुंबाकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता असून देखील बीडचा विकास का झाला नाही. रेल्वे प्रश्नांसह अन्य प्रश्न का सुटले नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.दरम्यान बीड मध्ये लोकसभेला  भाजपकडून प्रीतम मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे  शरद सोनावणे असा सामना रंगणार आहे.