तुमच्या चिक्की आणि मोबाईल घोटाळ्याची चौकशी माझ्या अध्यक्षते खाली होऊ द्या : धनंजय मुंडे

dhanjay mundhe

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुका आल्या की विरोधक हे सत्तधारी पक्षाचे घोटाळे जनतेला उलघडून सांगत असतात तर सत्ताधारी पक्ष आपलं पाप झाकून घेण्याचा प्रयत्न करत असतात. बीडच्या राजकारणात देखील असचं काहीस पाहिलं मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे आपल्या प्रत्येक भाषणात पंकजा मुंडे यांच्या चिक्की आणि मोबाईल घोटाळ्याचा वारंवार उल्लेख करताना दिसत आहेत. आता तर त्यांनी पंकजा यांना तुमच्या चिक्की आणि मोबाईलची चौकशी माझ्या अध्यक्षतेखाली होऊ द्या अस आव्हान दिल आहे. बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या प्रचार सभे दरम्यान मुंडे आज बोलत होते.

यावेळी मुंडे पंकजा मुंडेंना उद्देशून म्हणाले की, एक काम करा ना ताई, कुणी कशात तोडपाणी केली याची साधी सोपी चौकशी करा. जर विरोधी पक्षनेता म्हणून मी तोडपाणी केली असेल, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हीही राज्याच्या मंत्री आहात, तुमच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्याचे अधिकार तुम्हाला आहेत. काय चौकशी करायची असेल ती करा. त्यासोबत तुमच्याही चिक्की आणि मोबाईलची चौकशी माझ्या अध्यक्षतेखाली होऊ द्या. एकदाच दूध का दूध और पानी का पानी होऊ द्या, अस म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे आता हे आव्हान पंकजा मुंडे स्वीकारणार का हे लक्षवेधी ठरणार आहे.

Loading...

दरम्यान बीड च्या लोकसभेच्या रणांगणात भाजपकडून प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी कडून बजरंग सोनावणे हे आमने सामने येणार आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. मात्र या प्रचारात पंकजा मुंडे यांची चिक्की धनंजय मुंडे यांनी चांगलीच उचलून धरली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मी शरद पवारांसोबत जाणारचं... रामदास आठवले म्हणतात
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
आता इंदोरीकर महाराजांच्या कार्यक्रमाला युवासेनेच्या वाघांचे संरक्षण....
अमिताभ बच्चन यांच्यासोबत इंग्रजीत बोलाव लागल असतं तर..., नागराज मंजुळेंनी सांगितला अनुभव
तुकाराम मुंढे यांच्या 'या' निर्णयामुळे नागपूर पालिकेचे वर्षाला वाचणार सुमारे 10 ते 11 कोटी
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'तात्याराव, याच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली कारट्यानं'
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
राष्ट्रवादीच्या 'या' बड्या नेत्याने दिला राजीनामा