राज्यघटना बदलणे हे चिक्की खाण्या इतक सोप नाही : धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मुंडे बंधू – भगिंनी मध्ये शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस चांगलेच तीव्र होताना दिसत आहे. आता धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना शब्दात पकडले आहे. राज्यघटना बदलू अशा पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याला धरून धनंजय मुंडे यांनी सडकून टीका केली आहे.

धनंजय मुंडे म्हणाले की, सत्ताधारी सत्तेत आल्यापासून राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे बीडच्या पालकमंत्री प्रचार सभेत खुलेआम घटना बदलण्याची भाषा करत आहे. मात्र एवढं ध्यानात ठेवाव की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली ही समतेची घटना बदलणं चिक्की खाण्याइतकं सोपं नाही. अस म्हणत मुंडे यांनी पंकजा यांना जोरदार टोला मारला. तर गल्ली पासून दिल्ली पर्यंत यांच्या कडे सत्ता असून देखील यांना काय करता आल? असा देखील सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान पंकजा मुंडे यांच्या कडून एका प्रचार सभेत राज्यघटना बदलू असे वादग्रस्त विधान गेले. पण लक्षात येताच पंकजा मुंडे यांनी आपली चूक सुधारत आंबेडकरांची महती सांगत सारवासारव केली.