विम्याच्या तुटपुंज्या मिळकतीचे श्रेय लाटणे म्हणजे निव्वळ धुळफेक- धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा:- राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. या यात्रे मधूनच विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पीक विम्याच्या मुद्द्यावरून शिवसेना शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करत असी टीका केली. ते परभणीच्या गंगाखेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी म्हटले की, रब्बीचा विमा देणाऱ्या कंपन्यांवर मोर्चा काढायचा सोडून खरीपाचा पीक विमा देणाऱ्या कंपनीवर शिवसेनेने मोर्चा काढला होता. यामधून शिवसेनेचे शेतीविषयक ज्ञान आणि शेतकऱ्याबद्दलचा कळवळा साऱ्या महाराष्ट्राला दिसून आला आहे. उद्धव ठाकरेंनी जो मोर्चा काढला त्यातच त्यांचे ज्ञान सर्व महाराष्ट्राने आणि बघितले.

आता देखील शिवसेना आमच्यामुळेच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाल्याचे सांगत आहे. मात्र, हप्ता भरलेल्या केवळ 25 टक्के शेतकऱ्यांच्या पदरातच ही रक्कम मिळाली आहे. त्यामुळे पीक विम्याच्या तुटपुंज्या मिळकतीचे श्रेय लाटणे म्हणजे निव्वळ धुळफेक आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई पत्रकारपरिषद घेतली होती. यावेळी त्यांनी पीक विम्यासंदर्भात शिवसेना पाठपुरावा करत असल्याचा दावा केला होता. यानंतर धनंजय मुंडेंनी यांनी टिका केली आहे.

महत्वाच्या बातम्या