पंकजांच्या अनेक उद्योगपतींशी ओळखी; मग परळीत एकही व्यवसाय का नाही ?- धनंजय मुंडे

dhananjay mundhe and pankaja munde 2

टीम महाराष्ट्र देशा : गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना परळीत पंचतारांकित वसाहत उभारण्यासाठी प्रयत्न केले. पंकजा मुंडे यांची ‘अनेक उद्योगपतींशी ओळखी आहेत मग, परळीत एकही व्यवसाय का आणला नाही’ असा टोला विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी सायंकाळी परळीत पोचली. त्यावेळी मुंडे बोलत होते. धनंजय मुंडे म्हणाले, शेतकऱ्यांच्या विरोधामुळे त्यावेळी ते शक्य झाले नाही. परंतु, सिरसाळात २२०० एकर जमिन उपलब्ध असल्याचे पत्र आपण उद्योगमंत्र्यांना दिले. त्यानंतर अधिकारी पाहणीसाठी आल्यानंतर आमच्या ताईंना लक्षात आल्याचा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला सवालही त्यांनी केला.

जायकवाडीचे माजलगाव धरणात येणारे पाणी वाण धरणात आणण्याचे आणि परळीत पंचतारांकित वसाहत उभारण्याचे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न होते. गल्ली ते दिल्ली पर्यंत सत्ता असताना त्यांचेही स्वप्न पूर्ण करता आले नसल्याचा ही आरोप मुंडे यांनी केला.

महत्वाच्या बातम्या