fbpx

“नशा दौलत का ऐसा भी क्या, दानवेसाहेब तुम्ही लोकशाहीच विकत घ्यायला निघाले?”

ravsaheb danve and dhananjay munde

टीम महाराष्ट्र देशा – मी तुम्हाला पैसे देवू राहिलो, मग तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहणार की नाही, असे वक्तव्य दानवे यांनी केली आहे. त्यावर मुंडे यांनी ट्विट करत दानवेंचा निषेध नोद्वला आहे.

नशा दौलत का ऐसा भी क्या दानवेसाहेब की तुम्ही लोकशाहीच विकत घ्यायला निघाले? पूर्ण मराठवाड्यात तुमच्या ‘चकव्यां’ची ख्याती आहे, तुम्ही काय लोकांच्या मतांना विकत घेणार, असा प्रश्न मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

त्यासोबतच मुंडे यांनी दानवेंच्या निषेध केला आहे. तसेच निवडणूक आयोगाने दानवेंवर कारवाई करावी अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

दरम्यान, आपल्या विधानांनी कायम वादात सापडणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आणखीन एक विधान करून खळबळ उडवली आहे. मी तुम्हाला पैसे देवू राहिलो, मग तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहणार की नाही, असे वक्तव्य दानवे यांनी केली आहे. दरम्यान या बद्दलची व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरलं झाली आहे.

जालन्यातील विकास कामांच्या बैठकीत रावसाहेब दानवे बोलत होते. कोणी काहीही म्हणो देशातले सगळे चोट्टे एक झाले आहेत, आणि मोदीजींना प्रधानमंत्री होवू देवू नका म्हणत आहेत. आपल्याकडे ( जालना ) देखील सगळे चोट्टे एक झाले आहेत आणि रावसाहेब दानवेंना होवू देवू नका म्हणत असल्याची टीका देखील रावसाहेब दानवे यांनी यावेळी केली आहे.