“16 वर्षांची असताना धनजंय मुंडेनी माझ्यावर बळजबरी केली”, नातेवाईक तरुणीची तक्रार

dhananjay munde

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर गेल्या महिन्यांत अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्याविरोधात अत्याचाराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला आहे. ही तरुणी त्यांची मेहूणी असल्याचा दावा करतेय. नातेवाईक असलेल्या या तरुणीने ओशिवारी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. एवढेच नाही तर तरुणीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खा.सुप्रिया सुळे, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदीकडे मदतीची हाक दिली आहे.

तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, धनजंय मुंडे हे तिचे भावजी आहेत. तिच्यावर २००६ पासून अत्याचार सुरू होते. धनजंय मुंडे यांनी बॉलीवूडमध्ये गायिका म्हणून चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. तसेच याचे व्हिडीओ काढून धमकावल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. बहिण घरात नसताना अनेकदा तिच्यावर अत्याचार केल्याचे तरुणीचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे ती 16 वर्षांची असताना धनजंय यांनी तिच्यावर बळजबरी अत्याचार केल्याचा आरोप नातेवाईक युवतीने केला आहे.

 

 

पीडितेने 10 जानेवारी रोजी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 11 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांनी अर्ज स्वीकारला आहे.या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या आणखीन मोठ्या नेत्यावर अत्याचाराची तक्रार दाखल झाल्याने पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर अद्याप पक्षाच्या कोणत्याच नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

महत्वाच्या बातम्या