धनजंय मुंडेंमुळे डीसीसी बँकची निवडणूक रखडली-भाजपचा आरोप

bjp-ncp

बीड – बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मुदत मे-२०२० दरम्यान संपलेली आहे. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांनी निवडणूक तयारीसाठी २२ मार्च २०२० रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मुदत संपून १ वर्ष लोटले तरी अद्याप डीसीसी बँकेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही.

सहकारमंत्री व पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या सूचनेवरून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला नाही. मुदतीत निवडणुका घेणे हे घटनेला अभिप्रेत असताना फक्त राजकीय दबावापोटी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होत नाही, असा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

मस्के यांनी म्हटले आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या हिताची बँक आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी सभासदांना डीसीसी बँकेच्या निवडणुकीपासून दूर ढकलण्यामागे सहकारमंत्री व पालकमंत्री यांना नेमके काय साध्य करायचे आहे. अशाप्रकारे घटनाबाह्य कृतीमुळे संशय निर्माण झाला आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक तात्काळ जाहीर करून आदेशाची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मस्केंनी केली.

महत्वाच्या बातम्या