सरकार मधील मंत्रीच म्हणतात धनगर आरक्षणासाठी आणा सरकारवर दबाव

लातूर : धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी धनगर समाजाने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाब आणावा, असे आवाहन जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी लातूर येथे धनगर समाजाला केले. धनगर साहित्य परिषदेच्या वतीने लातूर येथे आयोजित  दुसऱ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात शिंदे बोलत होते.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

शिंदे म्हणाले, केंद्राकडे दोन विसंगत अहवाल गेल्याने आरक्षणाला खीळ बसली. आता पुन्हा हा अहवाल जाणार आहे. त्यावेळी तरी असे होऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. आरक्षण लागू झालेच पाहिजे व ते मिळवण्यासाठी सरकारवर दबाब आणण्याची जबाबदारी समाज व समाजाच्या संघटनांची आहे. गेल्या सत्तर वर्षात जे केले गेले नाही, ते विधायक काम विद्यमान सरकारने केल्याचे ते म्हणाले. सोलापूर विद्यापीठाला शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी उपसमितीही गठीत करण्यात आली आहे. कोणताही वाद वा संघर्ष न होऊ देता शासन हे नामकरण करणार आहे, त्याला भलेही विलंब लागेल. तो निर्णय सरकारचा असल्याने प्रत्यक्षात येईल. तो येईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असेही शिंदे म्हणाले. साहित्य परिषदेच्या व साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन होत असलेले समाज संघटन व संघटनशक्ती याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करुन धनगर साहित्य अभ्यासावे, असे आवाहन केले.

लातूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क ( टाऊन हॉल ) येथे दुसरे धनगर साहित्य संमेलन संपन्न झाले .या साहित्य संमेलनात प्रसिद्ध कवी ना. धों. महानोर, डॉ. कांचा इलय्या, इतिहास संशोधक संजय सोनवणी,अभिनेता,दिगदर्शक महेश कोठारे यांना जीवनगौरव पुरस्कार तर अण्णासाहेब डांगे, मालेगाव महापालिका आयुक्त संगीता धायगुडे , बाळासाहेब कर्णवर-पाटील आदींना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Shivjal