धनगर समाजातील एक लाख महिला मुख्यमंत्र्यांना राख्या पाठवणार

टीम महाराष्ट्र देशा :  मराठा संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद नंतर आज धनगर समाजाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने पुण्यात कौन्सिल हॉलच्या बाहेर धरणे आंदोलन केले जात आहे. धनगर समाजाला मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावे, यासाठी धनगर समाजातील एक लाख महिला राख्या पाठवणार आहेत.

दरम्यान, धनगर समाजाचा एस. टी. प्रवर्गात समावेश करण्यात यावा या मागणीसाठी पुण्यातील विधान भवनासमोर धनगर समाजातील नागरिक लाक्षणिक उपोषणाला बसले होते. या सरकारने धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न न सोडवल्यास आणखी तीव्र लढा उभारला जाईल.असा इशारा देखील उपोषणकर्त्यांनी सरकारला दिला आहे.

आरक्षण देणार की नाही हे स्पष्ट सांगावे –धनजंय मुंडे

Maratha- मराठा आरक्षणासाठी आता अर्धनग्न मराठा क्रांती मोर्चा !