धनगरांच्या लढ्याला यश : ‘धनगड’ शब्दाची दुरूस्ती करण्यासाठी सरकार हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणार

टीम महाराष्ट्र देशा : धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटला असून धनगर समाजाने मोठा लढा उभा केला आहे. या लढ्याला आता यश मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रात ‘धनगड’ ही जातच अस्तित्वात नसून, ‘धनगड’ या शब्दाची ‘धनगर’ अशी दुरूस्ती करण्यासाठी राज्य सरकार आज मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे.

दरम्यान, एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, धनगर समाजातील आंदोलकांची नवी मुंबईतील सानपाडा येथे भेट घेऊन मुंबईतील आझाद मैदानावर होणारे आंदोलन स्थगित करण्यात सरकारला यश आले आहे. सरकारच्या वतीने मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि मंत्री राम शिंदे यांनी आंदोलकांच्या मागण्या मान्य करत असल्याचे जाहीर केल्यानंतर आंदोलन काही काळाकरिता स्थगित करत असल्याचे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

Loading...

धनगर समाजाला आरक्षण मिळावे,अनुसूचित जमातीचा दाखला मिळावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यासाठी मोर्चे आंदोलने करूनही सरकार योग्य प्रतिसाद देत नसल्याने धनगर समाजाने अखेरचा लढा ‘धनगर आरक्षण’ हे ब्रीद घेवून महाड ते मंत्रालय अशी पदयात्रा आजपासून सुरू केली होती. आता भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तसेच मागण्या मान्य झाल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाचा 5 मार्चला शिवाजी पार्कवर होणारा धनगर आरक्षण अंमलबजावणी मेळावा देखील रद्द करण्यात आला असल्याची माहिती रासपचे महासचिव बाळासाहेब दोडतले यांनी काल दिली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल