धनगर आरक्षणाचा प्रश्न चिघळणार,‘टिस’चा अहवाल धनगर समाज विरोधात

मुंबई : ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ (टीस) या संस्थेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा असलेल्या भाजपच्या मनसुब्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘टीस’चा अहवाल धनगर समाजाच्या विरोधात असून ‘धनगर’ व ‘धनगड’ या दोन्ही भिन्न जाती आहेत असे अहवालात स्पष्ट नमूद केले आहे. त्यामुळे धनगर समाजाचे एसटी आरक्षण कठीण बनले आहे.

एकट्या समाजाच्या बळावर सत्तेत आलो नाही- महादेव जानकर

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ,धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ या नामांकित संस्थेकडून अहवाल मागविला होता. हा अहवाल गेल्या महिन्यात राज्य सरकारला सादर करण्यात आला. हा अहवाल मंत्रिमंडळाला सादर करून अहवालाच्या आधारे राज्य सरकारकडून केंद्र सरकारला आरक्षणाबाबत शिफारस करणे अपेक्षित होते. परंतु हा अहवाल नकारात्मक असल्याने या अहवालाबाबत गुप्तता पाळण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही हे स्पष्ट सांगावे : धनजंय मुंडे