महाडचे चवदार पाणी पिऊन निगरगट्ट सरकारला पाणी पाजणार – पडळकर

पुणे : २७ फेब्रुवारी पासून राज्यातला संपूर्ण धनगर समाज शेळ्या मेंढ्यासहीत महाड ते विधानभवन असा लॉंगमार्च काढणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याचा सत्याग्रह केलेल्या महाड येथील चवदार पाणी पिऊन निगरगट्ट सरकारला पाणी पाजण्यासाठी धनगर समाज अखेरचा लढा उभारणार असल्याची माहिती धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. धनगर समाजाला एससी एसटी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आता मुंबई सोडणार नसल्याचा इशारा देखील पडळकर यांनी दिला आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी धनगर समाजाचा एससी एसटीमध्ये समावेश करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मागील साडेचार वर्षात काहीच हालचाल झालेली नाही. त्यामुळे धनगर समाजाकडून अखेरचा लढा उभारण्यात येणार आहे. यावेळी राज्यभरातील ३० ते ४० लाख बांधव मुंबईत दाखल होणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. हा लढा कोणा नेतृत्वाचा नसून संपूर्ण समाजाचा आहे, त्यामुळे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर हे देखील लॉंगमार्चमध्ये सहभागी होणार असल्याचं पडळकर म्हणाले.

Loading...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आलं असून, देखील धनगर समाजासाठी ठाम भूमिका घेतली आहे. राज्यामध्ये ६३ आमदारांचे नेतृत्व करणारा पहिलाच अध्यक्ष धनगरासाठी भूमिका घेत असल्याचं पडळकर म्हणाले.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'