धनगर आरक्षण : विधानभवनावर धडकणाऱ्या मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी पनवेलमध्ये रोखले

पनवेल : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी महाड चवदार तळे ते मुंबई विधानभवनावर धडकणाऱ्या हजारो मोर्चेकऱ्यांना बुधवारी नवी मुंबई पोलिसांनी पनवेलमध्ये रोखले. या मोर्चात राज्यभरातील धनगर समाजाचे बांधव मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी आले होते. मोर्चेकऱ्यांना रोखण्यासाठी मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा मुंबई-गोवा महामार्गासह सायन-पनवेल महामार्गावर उपस्थित होता .

धनगर समाजाला आरक्षण मिळावे,अनुसूचित जमातीचा दाखला मिळावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यासाठी मोर्चे आंदोलने करूनही सरकार योग्य प्रतिसाद देत नसल्याने धनगर समाजाने अखेरचा लढा ‘धनगर आरक्षण’ हे ब्रीद घेवून महाड ते मंत्रालय अशी पदयात्रा आजपासून सुरू केली आहे. आरक्षणसाठी धनगर समाजाने एल्गार केला आहे. महाडच्या चवदार तळयावरून पदयात्रा निघाली आहे. १ मार्च रोजी मंत्रालयावर धडक देण्याचा निर्धार केला आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...