धनगर समाजाला खुशखबर, अनुसूचित जमातींचे सर्व लाभ मिळणार

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने धनगर समाजाला खुशखबर दिली आहे. राज्य सरकारने अनुसूचित जमातींमधील सर्व सवलती आता धनगर समाजाला लागू होणार आहेत. त्यामुळे धनगर समाजात आनंदाचे वातावरण आहे.

धनगर समाजाला आरक्षण देणारच अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारने डिसेंबरमध्ये केलेल्या घोषणेचं निर्णयात रुपांतर केलं. महाराष्ट्रात अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना २२ योजना दिल्या जातात, त्या आता धनगर समाजातील नागरिकांनाही लागू होणार आहेत.

Loading...

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समजाची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याच बोललं जात आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे. हा निर्णय घेताना राज्य सरकारने धनगर समाजाला थेट आरक्षण जाहीर न करता, अनुसूचित जमातीमध्ये मिळणाऱ्या सुविधा देऊ केल्या आहेत.

दरम्यान, मराठा समाजालाही राज्य सरकारने शिक्षणात १२ टक्के आणि नोकऱयांमध्ये १३ टक्के आरक्षण देण्यासाठी आरक्षण सुधारणा विधेयक मंजूर करून घेतलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि सेनेला या निर्णयांचा मोठा फायदा होणार आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?