#धनगरआरक्षण : २६ फेब्रुवारीला आझाद मैदानावर ‘सुंबराण’ आंदोलनाची हाक

नवी मुंबई : धनगर समाज आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक झाला असून राज्य सरकारवर पुन्हा एकदा दबाव आणण्याच्या तयारीत आहे. एकीकडे महाविकासआघाडी सरकारचे अधिवेशन मुंबईमध्ये होत असतानाच आता धनगर समाजाने सुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलनाची घोषणा केली आहे.

बीडमध्ये आयोजित राज्यस्तरीय धनगर समाजाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर यशवंत सेनेचे संस्थापक भारत सोन्नर यांनी याबाबत माहिती दिली. येत्या 26 तारखेला धनगर समाज ‘सुंबराण’ आंदोलन करणार आहे. या अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर, थेट मुख्यमंत्र्यांच्या घरासह इतर मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडण्याचा इशारा या आंदोलकांनी दिला आहे.

Loading...

भाजप- शिवसेना सरकारच्या काळातच धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला होता आणि त्यावेळी विरोधी पक्षात असलेले काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धनगर समाजाला आरक्षण संदर्भामध्ये अनेक आश्वासने दिले होते. आता स्वतः सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेससोबत शिवसेनेचेसुद्धा नेते आहेत म्हणून त्यांनी लवकरात लवकर धनगर आरक्षणाची घोषणा करावी अशी मागणी यशवंत सेनेकडून करण्यात आली आहे. जर या सरकारने आरक्षण प्रश्न सोडवला नाही तर थेट मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या घरात मेंढर सोडण्याचा धमकी वजा इशारा दिला आहे.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
... तर 'लॉकडाऊन'चा कालावधी वाढवावा लागेल; राजेश टोपे यांची माहिती