धनगर समाजाला आरक्षण देता येत नसल्याने सत्ताधारी पक्षाचा गोंधळ – धनंजय मुंडे

मुंबई : धनगर समाजाला आरक्षण देता येत नसल्याने सत्ताधारी पक्षाचे आमदारच गोंधळ घालून या विषयाची चर्चा होऊ देत नसल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते, धनंजय मुंडे यांनी केला आहे.

विधान परिषदेत आज धनगर आरक्षणाच्या संदर्भात नियम ९७ अन्वये रामहरी रुपनवर, रामराव वडकुते व इतर सदस्यांनी उपस्थित केलेल्या चर्चेत सहभागी होताना धनगर आरक्षणाबाबत ‘टीस’ (TISS) चा अहवाल सभागृहापुढे सादर न करता ॲटर्नी जनरल यांच्याकडे सुपूर्द केला.  यावरुन धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार संवेदनशील नाही हे दिसून येते, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

या वेळी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातल्याने  सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.  सरकारला आरक्षण देता येणार नसल्याने सत्ताधारी पक्षाचे सदस्य गोंधळ घालून चर्चा होऊ देत नसल्याचे मुंडे यांनी नंतर पत्रकारांशी बोलतांना सांगितले.