भाजपला मतदान न करण्याचा धनगर आरक्षण कृती समितीचा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा: पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांसाठी उद्या मतदान पार पडणार आहे, मात्र मतदानाला काही तास उरले असताना धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटल्याचं दिसत आहे, धनगर आरक्षणासंदर्भात भाजपने फसवणूक केल्याची भावना व्यक्त करत, महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समितीने भाजपला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. कृती समितीच्या या निर्णयाने समाजाचे प्राबल्य असणाऱ्या माढा, बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघात युतीला फटका बसू शकतो.

पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेत धनगर आरक्षण कृती समितीने आपला निर्णय जाहीर केला आहे, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सत्ता येताच धनगर आरक्षण देण्याचे मान्य केले होते, समाजाने पाच वर्ष वाट पाहिली, कृती समितीने शेवटच्या टप्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली, तरीही मुख्यमंत्र्यांनी वेळकाढू पणा केल्याचा आरोप कृती समितीकडून करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री सतत केवळ आरक्षण देण्याचे आश्वासन देत आहेत, त्यामुळे समाजाचे दैवत बोरीबाची शपथ घेवून भारतीय जनता पार्टीला मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याचं कृती समितीकडून सांगण्यात आलं आहे, तसेच देवाची शपथ घेतल्याने यापुढे कधीही भाजपला मतदान करणार नाही, असा निर्णय घोषित करण्यात आला आहे.Loading…
Loading...