ती उदयनराजेंची व्यक्तिगत भूमिका; धनंजय मुंडे

खासदार उदयनराजे भोसलेंनी केली होती कोरेगाव भीमा दंगलीचा आरोप असणाऱ्या संभाजी भिडेंची पाठराखण

बीड: कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांचा सहभाग नसल्याच वक्तव्य राष्ट्रवादी खासदार उदयनराजे भोसले यांनी केले होते. तसेच अशाप्रकारे भिडे गुरुजी यांच्यावर आरोप करणाऱ्याची लायकी नसल्याच हि ते म्हणाले होते. मात्र उदयनराजे यांनी केलेलं विधान हे त्यांचे व्यक्तिगत मत असून या दंगलीच्या मागे जे कोणी असतील त्यांना अटक झाली पाहिजे अशी पक्षाची भूमिका असल्याच विधान परिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

सध्याचे सरकार जाती-जातींमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहे. जे मागील दोनशे वर्षाच्या इतिहासात घडले नाही ते घडले. या दंगलीला सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी यावेळी केला. दरम्यान यापूर्वीही उदयनराजे भोसले यांनी या प्रकारे वक्तव्य केली असल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

काय म्हणाले होते उदयनराजे ?
“भिडे गुरुजी आज मॅथेमॅटिक्समध्ये पीएचडी केलेला, एक नंबर माणूस आहे. हे जर आम्हाला प्रोफेसर असते, त्यांनी आम्हाला प्रश्न-उत्तर दिले असते तर मी कधी आयुष्यात पासही झालो नसतो. ग्रेट माणूस आहे. त्याच्यावर अॅट्रॉसिटी लावता, थोडा तरी विचार करायला हवा. भिडे गुरुजी वडीलधारे आहेत. त्यांनी लहान मुलांचं संघटन केलं. त्यांच्याबद्दल आदर आहे आणि आदर राहाणार.त्यांचा काय संबंध पण नाही, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही,

कोरेगाव भीमा घटनेला हिंदुत्त्ववादी संघटना असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे, याबाबत विचारलं असता, उदयन राजे म्हणाले की, “जितेंद्र माझा मित्र आहे. आमदार आहे. हॅण्डसम आहे. पण त्याने थोडा विचार करायला हवा होता, काय बोलतो, कोणाशी बोलतो आणि कशासाठी बोलतो. इफ अँड बट ऑलवेज देअर

 

You might also like
Comments
Loading...