धनंजय, कधी कधी हरभजन सिंगही सामना जिंकून देतो रे – अजित पवार

राहुरी :माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची आज तुफान फटकेबाजी राहुरीकर नागरिकांना अनुभवायला मिळाली. क्रिकेटच्या सामन्यात विराट कोहलीच्या फलंदाजीनंतर हरभजन सिंग बॅटिंगला आला आहे. आता त्याची बॅटिंग कोण पाहणार तसे माझे झाले आहे, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हणताच ‘अरे धनंजय कधी कधी हरभजनसिंगही सामना जिंकून देतो रे. त्यामुळे तू बिनधास्त बॅटिंग कर’, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धीर दिला .

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र हल्लाबोल यात्रेस गुरुवारी प्रारंभ झाल्यानंतर राहुरी सभा पार पडली. अजित पवार यांनी आपल्या भाषणातून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. दरम्यान धनंजय मुंडे मोटारसायकल रॅलीसाठी स्वत: मोटार सायकलवर बसून रॅलीत सहभागी झाले होते . मोटारसायकल रॅली संपवून मुंडे सभास्थळी आली तेव्हा अजित पवार यांचे भाषण सुरु होते. अजित पवार यांचे भाषण संपताच उपस्थितांनी धनंजय मुंडे यांनी भाषण करावे, अजित पवार यांचे भाषण संपताच उपस्थितांनी धनंजय मुंडे यांनी भाषण करावे, असा आग्रह धरला.

प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ पक्षनेते यांनी भाषण केल्यानंतर मी बोलणे उचित ठरणार नाही असं मत मुंडे याचं होत मात्र तरीही श्रोत्यांच्या आग्रहाखातर अजित पवार यांनी मुंडे यांना भाषण करण्याची परवानगी दिली. कोहलीची बॅटिंग झाल्यानंतर हरभजन सिंगची बॅटिंग आता कोण पाहणार? असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला. यावर अजित पवारांनीही मुंडे यांना उत्तर देत म्हटले की, कधी कधी हरभजन सिंग सुद्धा सामना जिंकून देतो, तू बिनधास्त भाषण कर, अशा शब्दात धनंजय मुंडे यांना मॅच वीनरचा किताब दिला.

You might also like
Comments
Loading...