fbpx

नवनीतला दिल्लीत पाठविल्याशिवाय विकास होणार नाही : धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चांगलीच रंगत चढत असून प्रचारसभे दरम्यान विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांंना चांगलेच धारेवर धरले जात आहे. आज अमरावती येथे युवा स्वाभिमान पक्षाकडून लोकसभेसाठी नवनीत कौर राणा यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे देखील उपस्थित होते यावेळी मुंडे यांनी खा. अडसूळांंना निष्क्रिय खासदार म्हणत चांगलेच तोंडसुख घेतले.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, या सरकारने १२५ कोटी जनतेला केवळ स्वप्नं दाखविले आहेत. मी एकही नरेंद्र मोदींचं भाषण विसरलो नाही. तसेच आता कुणी जर अच्छे दिन म्हटलं तर लोक हसतात अशी खिल्ली देखील मुंडे यांनी उडवली. तर अच्छे दिनच्या नावाने १२५  कोटी जनतेला फसवलं आहे. ५  लाखाच्या नावानं फसवलं आहे, असा आरोप धनंजय मुंडेंनी केला आहे. तर नवनीतला दिल्लीला पाठविल्याशिवाय विकास होणार नाही, असं भाकीत धनंजय मुंडे यांनी केलंं आहे.

दरम्यान, नवनीत कौर राणा या युवा स्वाभिमान पक्षाकडून लोकसभेला शिवसेनेचे खा. अनंतराव अडसूळ यांच्या विरोधात लढणार आहेत. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी कडून युवा स्वाभिमान पक्षाला पाठींबा देण्यात आला आहे.

1 Comment

Click here to post a comment