आरक्षण कधी देणार ते बोला, धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडे यांना सवाल

टीम महाराष्ट्र देशा- धनगर समाजाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रामराव वडकुते यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची मंत्रालयाच्या गेटवर वाट अडवली. पंकजा मुंडे आज मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात आल्या होत्या. आज मंत्रालयात अडवलं, उद्या सरकारमध्ये येण्यापासून अडवू, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही’, ‘मंत्रालयाची पायरी चढणार नाही’… मंत्र्यांनो ! शब्दांचा खेळ करणे थांबवा. आरक्षण कधी देणार ते बोला. नाहीतर आज आम्ही मंत्रालयात अडवलं, उद्या सरकारमध्ये येण्यापासून ही जनताच तुम्हाला अडवेल असा टोला देतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना लगावला आहे.

दरम्यान,भाजप धनगर समाजाच्या जोरावर सत्तेत आले पण त्यांना आता धनगरांचा विसर पडला आहे. हे सरकार धनगर समाजाची फसवणूक करत आहे. उच्चवर्णीय समाजाला सरकार १० टक्के आरक्षण देते मग धनगर समाजाला का नाही, असा सवाल आमदार रामराव वडकुते यांनी उपस्थित केला

You might also like
Comments
Loading...