विरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं

टीम महाराष्ट्र देशा- विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून ओळखले जातात.शेतकऱ्यांच्या असो किंवा इतर नागरिकांच्या समस्या यावर आपली मत बिनधास्तपणे ते मांडत असतात तसेच सरकारवर खळबळजनक आरोप करण्यात तसेच जाब विचारण्यात सर्वात आघाडीवर ते असतात. मात्र आता मुंडेनी ज्या समस्येचा जाब विचारला आहे त्यामुळे त्यांचे अज्ञान तर समोर आलेच आहे त्याचबरोबर मुंडे सरकारवर खोटे आरोप करतात कि काय असा देखील सवाल उपस्थित झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तान यात्रा सुरू असून त्यानिमित्त महाराष्ट्र दौरा करण्यात येत आहे. त्यामध्ये, राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. या संभांमधून ते राज्य सरकार आणि मोदी सरकारवर जोरदार टीका करत आहेत. मुंडेंच्या या सभांचे वार्तांकन सोशल मीडियातून तात्काळ जनतेपर्यंत पोहोचविण्याचं काम त्यांचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी करतात.

याच प्रशांत जोशी याचं whatsapp काल दुपारी तांत्रिक कारणांमुळे बंद झालं. उठसुठ कोणत्याही गोष्टीसाठी सकारला जबाबदार धरण्याची सवय लागलेल्या मुंडेनी जोशींचे whatsapp बंद होण्यामागे देखील सरकारचा हात असल्याचा सनसनाटी आरोप केला. धनुभाऊ एवढ्यावरच थांबले नाहीत तर चक्क देशात डिजिटल आणीबाणी लागू झाली असा देखील आरोप त्यांनी करून टाकला.विरोधी पक्षनेत्याच्या पीआरओच्या फोनवर नजर ठेवणं, त्यांचा नंबर बॅन करणं, त्यांच्या फोनवर बंदी आणणं, म्हणजे देशात आणीबाणी लागू करण्यासारखंच असल्याचा विनोदी आरोपही मुंडे यांनी केला.

नेमकं काय झालं ?
Whatsapp च्या नवीन नियमानुसार अनेक लोकांना एकच मेसेज पाठवल्यावर स्पॅमर समजून whatsapp कडून User ला बॅन केले जाते, पण या नियमाबद्दल अनभिज्ञ असलेल्या मुंडे यांनी या प्रकारचा मोदीशी संबध जोडून PA च्या whatsapp बंद करण्यास कारणीभूत ठरवले आहे.

मुंडेंच्या या अज्ञानाबद्दल सोशल मीडियात उलट सुलट चर्चा झडत आहेत.मुंडेंची सर्वत्र नाचक्की झाली असून सरकारवर मुंडेनी केलेले इतर आरोप देखील खरे आहेत का? याबद्दल देखील शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.तसेच जोशींना जर  whatsapp बंद होण्यामागे देखील सरकारचा हात आहे असं वाटतं होतं तर पोलिसांकडे का तक्रार केली नाही हा देखील प्रश्न अनुत्तरीत आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या – 

Loading...

शेतकरी संकटात असताना वीजबिलाची सक्तीने वसुली म्हणजे मड्यावरचे लोणी खाण्याचा प्रकार : मुंडे

Loading...

राणेंची स्वाभिमानी डरकाळी,भाजपच्या नाकावर टिचून लोकसभा स्वतंत्र लढवणार

2 Comments

Click here to post a comment