मुंडे साहेबांच्या मृत्यूबाबत संशय होताच : धनंजय मुंडे

blank

पुणे : गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित हॅकरने केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघाले आहे. त्यानं लाइव्ह प्रेस कॉन्फरन्स घेतली असून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या होत्या असा आरोप त्यानं केला आहे.युरोपमध्ये इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन (IJA) कडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्ताने अमेरिकन सायबर एक्स्पर्टला बोलवण्यात आलं होतं.

गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाला, त्या दिवसापासून अपघात की घात, असा संशय होता, आजही तो कायम आहे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.’इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) हॅक’ होऊ शकते. गेली 2014 मधील लोकसभा निवडणूक ‘ईव्हीएम’मध्ये फेरफार करून जिंकण्यात आली होती. इतकेच नव्हे तर भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना या गैरव्यवहाराची कल्पना होती, म्हणून त्यांची हत्या झाली,” असा खबळजनक दावा सय्यद शुजाने केला आहे.

या दाव्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना संशय व्यक्त केला आहे.या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. ‘गोपीनाथराव मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा एका सायबर तज्ज्ञानं केला आहे. या दाव्याची रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी झाली पाहिजे. कारण ही माहिती एका लोकनेत्याशी संबंधित आहे,’ असं मुंडेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान,भारतीय निवडणूक आयोगाने या हॅकरने केलेला दावा फेटाळून लावला आहे. निवडणूक आयोग या प्रकरणात पडू इच्छित नाही. भारतातील EVM सुरक्षित आहेत, त्यांमध्ये छेडछाड होऊ शकत नाही, या दाव्यावर आम्ही कायम आहोत. भारतात वापरल्या जाणाऱया EVM मशीन भारत इलेक्ट्रॉनिक अँड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कडून अत्यंत कठोर निरीक्षणाखाली तयार केल्या जातात. 2010 साली नियुक्त करण्यात आलेल्या तांत्रिक तज्ञांच्या समितीच्या देखरेखीखाली हे काम पूर्ण केले जाते असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.