अजित पवारांच्या पाठोपाठ धनंजय मुंडेचीही जीभ घसरली, गिरीश महाजनांना म्हणाले ‘पिस्तुल्या’

blank

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतर्फे परळीत बुधवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात आला. परळी येथील शेतकरी मोर्चाला संबोधित करताना धनंजय मुंडे यांची जीभ घसरली. तसेच यावेळी एकेरी उल्लेख करत गिरीश महाजन यांचे उदाहरण दिले.

धनंजय मुंडे म्हणाले, ‘प्रेमाने आपण त्यांना पिस्तूलराव म्हणतो तर काहीजण लाडाने पिस्तुल्या म्हणतात’, असे म्हणत महाजनांवर त्यांनी शाब्दिक निशाणा साधला.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या तोंडावर आरोप प्रत्यारोप सुरु आहे. परंतु मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात नेते पक्षांतर करत असल्यामुळे राष्ट्रवादी- कॉंग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

शरद पवारांवर टीका करण्याचा बालिशपणा चंद्रकात पाटलांनी सोडून द्यावा : धनंजय मुंडे

विनयभंगाच्या व्हीडीओवर मुंबईच्या महापौरांचा खुलासा म्हणाले…