fbpx

सरकारने शेतकऱ्यांची फसवणुक केली – धनंजय मुंडे

धनंजय मुंडे

नागपूर – बोंडअळीमुळे शेतकरी उध्दवस्त झाला असल्याने त्याला किमान एकरी 25 हजार रुपये मदत देण्याची आवश्यकता आहे. असे असताना सरकारने पीक विमा, एनडीआरएफ आणि सीड ॲक्ट खालील बियाणे कंपन्या यांचे एकत्रित पॅकेज देऊन त्यांची फसणवीस सरकारने पुन्हा एकदा फसवणुक केल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने संकटात सापडलेल्या जाहीर केलेली मदत अतिशय तोकडी आहे. ही मदत देताना सरकारने स्वत:च्या तिजोरीतून कसलीही मदत न देता पीक विमा, एनडीआरएफ आणि सीड ॲक्ट यांच्या खिशातून मदत देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांना 25 हजार रुपये एकरी मदत देण्याची गरज होती, मात्र सरकारने जाहीर केलेली आकडेवारी फसवी आणि जगलरी करणारी आहे.

या आकडेवारीमध्ये विमा कंपन्यांद्वारे मिळणारी भरपाई टाकणे हे अन्यायकारक आहे. कारण मागील वर्षांचा अनुभव पाहता विमा कंपन्या 10 टक्के शेतकऱ्यांना सुध्दा भरपाई देत नाहीत. तसेच या मदतीच्या आकड्यांमध्ये सीड ॲक्टखाली कंपन्यांकडून मिळणारी भरपाईदेखील समाविष्ठ करणे ही शुध्द फसवणुक आहे.

कारण मुळात बियाणे कंपन्यांकडून भरपाई मागण्याची पध्दतच आपण इतकी क्लिष्ट ठेवलेली आहे की, 10 टक्के सुध्दा शेतकरी त्यात पात्र होणार नाहीत. म्हणजेच कापुस उत्पादक शेतकऱ्याला एकरी 2 हजार रुपयांच्या पलीकडे मदत मिळणार नाही. असा आरोप त्यांनी केला आहे.

1 Comment

Click here to post a comment