भाजपने जनतेचा विश्वासघात केला – धनंजय मुंडे

वर्धा : विश्वासाने जनतेने भाजपला निवडून दिले परंतु या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. शिवाय शेतकरी राजाही उध्वस्त करण्याचे काम या सरकारने केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सेलसुरा येथील सभेत केला.

bagdure

विदर्भामध्ये पदयात्रेमधून जात असताना जनता या सरकावर रोष व्यक्त करत आहेत. कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीने त्रस्त झाला आहे. मोदी सरकारने जाहीर केलेल्या मुद्रा योजनेचा लाभही इथल्या जनतेला मिळालेला नाही.

सगळयाच बाबतीत सरकार अपयशी ठरत असून सर्वसामान्य जनता असंतोष व्यक्त करताना दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेवर होणारा अन्याय सहन करणार नाही.सरकारला जाब विचारण्यासाठीच आम्ही हा एल्गार पुकारला असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...