fbpx

‘गोपीनाथ गडा’वर धनंजय मुंडेंची सत्ता; पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात

pankaja munde & dhananjay munde

बीड : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे. पंकजा मुंडे यांचं वर्चस्व असलेली पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या पॅनलने जिंकली आहे.  गोपीनाथ गड असणाऱ्या पांगरीमध्ये 12 सदस्य पैकी धनंजय मुंडे गटाचे 10 सदस्य निवडून आले आहेत.राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आले आहेत. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने राज्याच्या राजकारणात कधी नव्हे एवढे महत्व या निवडणुकांना आले आहे.

बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडेंचा असा सामना रंगला आहे. यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना हरवलं होतं. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमधे नक्की कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण बीड जिल्ह्या लक्ष लागल होत. सध्या बीडमध्ये होणा-या प्रत्येक निवडणुकीकडे पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे म्हणून पाहिले जाते. आज राज्यातील 16 जिल्ह्यातील 3 हजार 131 ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरु आहे.