परळीतील एकही रस्ता शिल्लक ठेवणार – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेमुळे परळी शहर मात्र विकासातुन बदलत असल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. परळीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी आगामी तीन महिन्यात नविन पाणी पुरवठा योजना पुर्ण करणार असल्याचे तसेच नगरोत्थान योजने अंतर्गत 100 कोटी रुपये खर्चुन रस्त्यांची कामे करून एकही रस्ता शिल्लक ठेवणार नसल्याचा शब्द ही त्यांनी दिला. परळी शहरातील विद्यानगर भागातील विविध रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ व लोकार्पण धनंजय मुंडे यांच्या हस्ते कार्यक्रमास संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते