…तर काँग्रेससाठी परळीची जागा सोडणार- धनंजय मुंडे

वणी: राष्ट्रवादी कॉंग्रसचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी वणी जि. यवतमाळ येथे पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात, मोदींची देशात लूट सुरू असून त्याबाबत जनतेला कार्यकर्त्यानी जागृत करावे असे आवाहन केले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, यवतमाळ व वणी या विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दावा करणार असून वेळ पडल्यास काँग्रेसला परळीची जागा सोडू. असे मुंडे यांनी स्पष्ट केले.  मुंडे यानी राज्यशासनाच्या धोरणांवर टीका केली. निव्वळ आश्वासनाची खैरात वाटून जनतेची फसवणूक केली जात आहे. भाजप सरकार पेट्रोल, डिझेल, व सिलिंडरचे भाव दररोज वाढवित आहे, अशा पक्षाला पुन्हा निवडून द्याल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थिती केला.

You might also like
Comments
Loading...