परळीमध्ये पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे, पंकजांना टक्कर देण्यासाठी धनंजय मुंडे मैदानात

blank

टीम महाराष्ट्र देशा: दिग्गज नेत्यांनी साथ सोडल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार हे स्वतः मैदानात उतरले आहेत. सोलापूर, उस्मानाबाद पाठोपाठ पवार यांनी आज बीडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आहे. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना परळी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

धनंजय मुंडे हे परळीतून लढणार असल्याचे निश्चित झाले आहे, त्यामुळे २०१४ प्रमाणे पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे लढाई परळीकरांना पहायला मिळणार आहे. मागील निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा २५ हजार मतांनी पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी धनंजय मुंडे यांनी कंबर कसल्याचं दिसत आहे.

पंकजा मुंडे या सध्या राज्य मंत्रीमंडळात ग्रामीणविकास मंत्री म्हणून काम पाहत आहेत. मागील पाच वर्षात त्यांनी कोट्यावधींचा निधी खेचून आणला आहे. मात्र २०१६ मध्ये परळी नगरपालिका आणि २०१७ मध्ये पंचायत समिती निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

जिल्हा परिषदे मात्र पंकजाताईनी धनुभाऊला धोबीपछाड दिला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर यांच्यासारखे बडे नेते आता पक्षासोबत नाहीत, याचा फटका धनंजय मुंडे यांना बसू शकतो. शेवटी दोन्ही मुंडेमध्ये होणारी लढाई हि राज्यामध्ये लक्षवेधी ठरणार हे निश्चित आहे.

महत्वाच्या बातम्या