fbpx

अवकाळी पावसासोबत धनंजय मुंडेही सरकारवर बरसले

dhananjay munde

टीम महाराष्ट्र देशा: धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनी काल जोरदार पावसात सरकारला चांगले धो धो धुतले. धनंजय मुंडे म्हणाले, कुर्डूवाडीची हल्लाबोल सभा जशी अवकाळी पावसात होत आहे, तसेच राज्यात आणि देशात भाजपचे अवकाळी सरकार सत्तेवर आले आहे. अवकाळी पाऊस असो की अवकाळी आलेले सरकार दोन्हीही नुकसान करणारे असल्यानेच हे अवकाळी सरकार बदलण्याचा निर्धार करूया. असे मुंडे म्हणाले.

जनतेच्या या भक्कम पाठिंब्यावरच राष्ट्रवादी काँग्रेस २०१९ ला या फसव्या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा अजित पवार यांनी दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. जनतेनीही हल्लाबोल यात्रेला चांगला प्रतिसाद दिला. भाजप सरकारला सत्तेवरून खेचण्याचा निर्धारच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान. हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सूर आहे.

अजितदादा पवार यांनी सुद्धा सरकारवर तुफान शाब्दिक फटकेबाजी केली.