गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धनंजय मुंडेंनी केली पाहणी

जालना तसेच महाराष्ट्रातील काही भागांत दोन दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीने शेतीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकाच नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आज विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी गारपीटग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला.

गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे ४८ तासात पंचनामे करण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. मार, ७२ तास उलटुनही अद्याप पंचनाम्यास सुरूवात झालेली नाही. त्यामुळे सरकारने शेतकर्‍यांचा अंत पाहु नये असा इशारा यावेळी मुंडे यांनी दिला.

शनिवारी आणि रविवारी राज्यातील काही भागात गारपीट झाली. यावेळी मोठ्या प्रमाणत शेतीच नुकसान झाल आहे. जालना जिल्ह्यातील जालना व मंठा तालुका गारपीटीमुळे सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत. या तालुक्याचा आज धनंजय मुंडे यांनी दौरा करून पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.

You might also like
Comments
Loading...