fbpx

लोकांना माझ्यात गोपीनाथ मुंडे साहेबांची छबी दिसते – धनंजय मुंडे

gopinath munde and dhananjay munde

टीम महाराष्ट्र देशा: लोकांना माझ्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांची छबी दिसते, ते माझ्याकडे साहेबांसारखे जॅकेटही घालत जा, अशी प्रेमळ इच्छा व्यक्त करतात, अशी भावना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्यातील दहिवडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाला धनंजय मुंडे उपस्थित होते.

धनंजय मुंडे यांनी दहिवडी येथे सप्ताहाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर ट्विटकरत आपली भावना व्यक्त केली आहे. दहिवडीमधील महिलांनी दिलेल्या भेटीमुळे मी भारावून गेलो. या प्रेमाची उतराई माझ्या चांगल्या कामातून करून देईल.

माझ्यात त्यांना स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांची छबी दिसत असल्याची प्रशंसा केली. साहेबांसारखे जॅकेटही घालत जा अशी प्रेमळ इच्छा व्यक्त केली. तुमचं प्रेम हा माझा दागिना आहे. असे धनंजय मुंडे यांनी म्हंटले आहे.